Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देऊन राज्यपालांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी सत्कार केला.


महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांची जनगणनेत अनुसूचित जातीत नोंद करण्यात यावी.राज्यात ज्यांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धम्मात धर्मांतर केले आहे अशा नवबौद्ध समाजाची नोंद जनगणनेत अनुसूचित जातीत व्हावी या मागणीबाबत ना. रामदास आठवले यांनी महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा इतिहास सांगितला.


तसेच अनुसूचित जाती जमाती; इतर मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना - अधिकाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे आणि गायरान जमिनीवरील १४ एप्रिल २००० सालापर्यंत चे अतिक्रमण नियमित करावे या मागण्यांचे निवेदन ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिले. या निवेदनातील विषयांवर राज्यसरकारला निर्देश देण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना केली.त्यावर निवेदन वाचून प्रश्नांचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने ही ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली.त्यात पी ए सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री सुखदेव थोरात; वासुदेव गाडे; चंद्रशेखर कांबळे यांचा समावेश होता.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; कांतिकुमार जैन; अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; चंद्रपूर चे रिपाइं नेते अशोक घोटेकर; सुनील बन्सी मोरे; आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध