Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला


महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त कारवाई


एकाच दिवशी १४४ झोपड्या पाडण्याची मुंबईच्या इतिहासातील पहिली घटना


मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा सफाया करण्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले असून मानखुर्द मधील मोकळ्या भूखंडावर एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी अतिक्रमण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या भूखंडावरील तब्बल चौदाशे झोपड्यांवर महापालिकेने कारवाई करून हा भूखंड मोकळा केला. या माध्यमातून एका विशिष्ट समाजाकडून होत असलेला हा प्रयत्न उत्तर प्रदेश पॅटर्न नुसार हाणून पडण्यात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यश आले आहे. एकाच दिवशी चौदाशे झोपड्यांवर कारवाई करणे हे मुंबई महापालिका इतिहासातील आजवरची मोठी घटना आहे.


घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे बुधवारी ८ एप्रिल २०२६ रोजी बुलडोझर चढवून कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.


‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागातील घाटकोपर-मानखुर्द या जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक १/२ (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) हे सुमारे २२ एकर जमीन क्षेत्र असून त्यावर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.


त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-५) देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली. इमारत व कारखाना विभागातील सहायक कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच, सुमारे २०० कामगारांसह ३ पोकलेन, ७ जेसीबी, १० डंपर, २ ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा