Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत बांद्र्यातून समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे दोघांमध्ये पॅचअप झाल्याच्या आणि पुन्हा लग्न ठरण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. १४ २०००



बांद्र्यातील व्हिडिओमुळे चर्चांना वेग


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना एका रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत पलाश मुच्छलची बहीण आणि गायिका पलक मुच्छल तसेच तिचा पती मिथुनही उपस्थित असल्याचे दिसते. या भेटीत पलकने स्मृतीच्या वडिलांचा आशीर्वाद घेतल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते.



नात्यात दुरावा का आला ?


भारतीय महिला क्रिकेट प्लेअर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल मागच्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. हळदीचे, संगीताचे अनेक फोटो समोर आले, त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण अचानक स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि लग्न पुढे ढकलले आहे हे जाहीर करण्यात आले. परंतु त्या नंतर सोशल मीडियावर अनेक दावे प्रतिदावे झाले, ज्या वरून चाहत्यांना स्पष्ट झाले की यांचे लग्न मोडले आहे.


संगीत सोहळा संपल्यानंतर महिला टीमच्या मुलींनी पलाशला एका मुलीसोबत त्या अवस्थेत पहिले, त्यावरून पलाशवर फसवणुकीचे अनेक आरोप करण्यात आले, पलाश प्ले बॉय आहे, त्याने स्मृतीला फसवले अश्या अनेक गोष्टी समोर आल्या, दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले लग्न मोडले असल्याचे स्पष्ट केले होते.



सोशल मीडियावर प्रतिक्रिया


सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच आता या घडामोडींमुळे जुने वाद मिटले आहेत का? स्मृती आणि पलाश खरंच लग्न करणार आहेत का ? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.  काहींनी दोघांच्या नात्याला दुसरी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी हा व्हिडिओ जुना असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या चर्चांबाबत अद्याप स्पष्टता नाही.


एकूणच, बांद्र्यातील या भेटीमुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.


Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)