RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला

एमपीसीच्या बैठकीत कोणताही बदल नाही


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2026-27 आर्थिक वर्षासाठी पहिल्या मौद्रिक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे निकाल आज, 8 एप्रिलला जाहीर केले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे आणि यामध्ये कोणतीही बदल करण्यात आलेली नाहीत.


आरबीआयने पॉलिसी स्टान्स न्यूट्रल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, हे निर्णय जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतले गेले आहेत. कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती


जर आपण बँकेकडून फ्लोटिंग रेटवर लोन घेतले असेल, तर सध्या तुमच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये बदल थेट बँकांच्या कर्ज व ठेवीच्या व्याजदरांवर परिणाम करतो.


रेपो रेट कमी केल्यास बँका कर्जाचे व्याजदर कमी करतात.


रेपो रेट वाढल्यास बँका कर्जाचे व्याजदर वाढवतात.


रेपो रेट असा दर आहे, ज्यावर आरबीआय देशातील बँकांना पैसे उधार देते. त्यामुळे रेपो रेटचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतो.


मागील वर्षीचे रेपो रेटमधील बदल


फेब्रुवारी 2025: 6.50 → 6.25 टक्के


एप्रिल 2025: 6.25 → 6 टक्के


जून 2025: 6 → 5.50 टक्के


ऑगस्ट 2025: स्थिर 5.50 टक्के


ऑक्टोबर 2025: स्थिर 5.50 टक्के


डिसेंबर 2025: 5.50 → 5.25 टक्के


फेब्रुवारी 2026: स्थिर 5.25 टक्के

Comments
Add Comment

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Thane Mayor Marathon : 'गतिशील ठाणे'! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन संपन्न

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या

Kyiv Ukraine Weapons Depot Explosion : कीवजवळ शस्त्रसाठ्यावर ड्रोन हल्ला; भीषण स्फोटात ३७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवजवळील मिला गावात मोठी दुर्घटना घडली आहे.

Cyber Fraud : नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक, तब्बल ९० लाखांचा घोटाळा

नाशिक : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे (Mumbai ATS) नाव