Crime News : मुलांवर आणि पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणारा तरुण अटकेत, मोबाईलमध्ये आढळले ६०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून अल्पवयीन मुले आणि तरुण पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका २२ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये तब्बल ६०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


चेतन प्रकाश कोळी (रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी भातपोरी/भोने फाटा परिसरातील एका पपईच्या शेतातून त्याला अटक करण्यात आली. आरोपी एका अल्पवयीन मुलाला फसवून तिथे घेऊन गेल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने आरोपीला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. साध्या वेशातील पोलिसांनी परिसरावर लक्ष ठेवून आरोपीला चौफेर घेरले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीच्या मोबाईलची पाहणी केली असता, त्याच्या एका 'हिडन फोल्डर'मध्ये ६०० हून अधिक आक्षेपार्ह आणि लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो आढळून आले. फॉरेन्सिक टीमने हा डिजिटल पुरावा सुरक्षित केला आहे.


पोलीस शिपाई रूपेश पगारे यांच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (३), ३५१ (२), बाल न्याय कायदा कलम ७५ आणि पॉक्सो कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुरानिक यांनी या पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा खटला जलदगती (फास्ट-ट्रॅक) न्यायालयात चालवण्याची आणि पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.



चार वर्षांपासून कृत्य


आरोपी २०२२ पासून अल्पवयीन मुले आणि तरुणांना निशाणा बनवत होता. तो पीडितांना पैशांचे आमिष दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. या कृत्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी देऊन तो पीडितांना ब्लॅकमेल करत असे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे