Ashok Kharat Case : नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचे 'खरात कनेक्शन' उघड!

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात एक वरिष्ठ महिला अधिकारी पोलिसांच्या रडारवर आली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.



भोंदू अशोक खरात प्रकरणी बड्या महिला अधिकाऱ्याचे 'पोस्टिंग कनेक्शन' उघड?


या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती मोठी माहिती लागली असून, एक वरिष्ठ महिला अधिकारी आता थेट तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय मदत केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने आणि अशोक खरातने एकमेकांना 'कथीत' सहकार्य केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर खरातचे काम सुलभ केले आणि त्या बदल्यात अशोक खरातने आपले राजकीय व प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा सध्या नाशिकच्या वर्तुळात रंगली आहे. केवळ बदली आणि पोस्टिंगच नाही, तर या महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? या दिशेनेही एसआयटीने आपला तपास चक्राकार फिरवला आहे. जर या व्यवहारांचे पुरावे सापडले, तर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

BJP Foundation Day : भाजप स्थापना दिनाच्या पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि योगींनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले ...

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे