Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुक यांसारखे गुन्हे देखील आता समोर येत आहे. अशातच आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


अशोक खरातवर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहीजे. यावर लक्ष द्यायला पाहीजे. आपल्याकडे पुन्हा अशा घटना घडल्याच नाही पाहीजे, असं गौतमी पाटील म्हणाली. तसेच यासाठी कडक कारवाई व्हायला हवी, म्हणजे देशात असे प्रकार कुठे घडणार नाहीत, असंही गौतमीने सांगितले.


अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून अशोक खरातसह समता पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. २०२१ साली समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत उघडली १०० खाती उघडून या खात्यातून आतापर्यंत ६० कोटीहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे.


या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डी पोलीसांकडून १९ खातेदारांची चौकशी सुरू असताना हा घोटाळा समोर आला आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या तपासात खरातच्या अनेक मालमत्ता आणि बँक खात्यांबाबत माहिती उघड झाली.


अनेकांना जाळ्यात फसवून भोंदूबाबा अशोक खरातनं मोठी संपत्ती जमवल्याचं तपासात समोर आलं आहे. यामुळे भोंदूबाबा अशोक खरात आता ईडीच्याही निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणाचा तपास आता ईडी करणार असून यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


भोंदू बाबा अशोक खरातनं केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर 'हवाला' रॅकेटच्या माध्यमानंही फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती असून अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे २५ हजार रुपये एवढे होते. वर्षभर ही रूम अशोक खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचं या तपासात समोर येत असून भोंदूबाबा अशोक खरातबाबत अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या