Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे गिट्टीखदान पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात पीडित मुलाच्या परिचित असलेल्या मित्रांनीच हा गुन्ह्या केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयराम गोपाल यादव (१९, रा. गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (२२, रा. गिट्टीखदान) आणि आयुष मोहन शाहू (१९, रा. मानकापूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती.


नेमकं काय घडलं ?


माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाल व्यवसाय असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती. त्यानुसार त्यांनी ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचला. या अपहरणाची योजना ३ दिवसांपूर्वी आखण्यात आली होती.


हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी जयराम यादवनं त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेलं, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते. तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि आवाज करू नये म्हणून त्याचं तोंड बांधलं.


यानंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेलं. सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो बेशुद्ध होत नसल्यानं आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या आरोपींनी कापडानं गळा दाबून हत्या केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपींनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ भरतवाडा परिसरात फेकून दिला आणि वापरलेली गाडी धुवून टाकली.


दरम्यान, अथर्व बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयास्पद टाटा एस वाहन दिसून आल्याने या आधारे पोलिसांनी आयुष शाहूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली असून, सध्या या प्रकरणाबाबत आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Sunil Tatkare: 'हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार'

बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू

Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना