Sunil Tatkare: 'हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार'

बारामती: राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा फक्त एक उमेदवारी अर्ज नाही, तर अजितदादांनी निवडलेल्या विकासाच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्धार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज आपले विचार मांडले.


आजही बारामतीकरांच्या मनात दादांबद्दल अपार प्रेम आणि त्यांच्या विचारांवर अपार श्रद्धा आहे. आजवर जशी साथ बारामतीकरांनी दादांना दिली, तशीच साथ आता वहिनींनाही द्यावी, अशी मनापासून विनंती सुनिल तटकरे यांनी बारामतीकरांना केली.


ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करू. परंतु निवडणूक लादली गेलीच, तर भारताच्या विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याने वहिनींना बारामतीकर निवडून देतील. बारामतीकरांचं प्रत्येक मत म्हणजे अजितदादांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.


Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम