Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. श्रद्धा नगर भागात भरदिवसा तीन जणांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपींची धिंड काढत त्यांच्या दहशतीला लगाम घातला आहे.



धारदार शस्त्रांनी तिघांवर हल्ला


५ एप्रिल रोजी दुपारी कौलखेड परिसरात पाच जणांनी धारदार शस्त्रांनी तीन युवकांवर हल्ला केला. या हल्ल्यात अभिलाष हिंगे, रविकिरण उर्फ छोटू ठाकरे आणि हरी ओम रोठे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.



चित्रपट पाहून नशेत धिंगाणा


प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी धुरंधर 2 ( Dhurandhar 2 ) हा चित्रपट पाहिल्यानंतर नशेत परिसरात धिंगाणा घातला. स्वतःला ‘धुरंधर’ समजत त्यांनी नागरिकांवर हल्ला करत दहशत निर्माण केली. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.



२४ तासांत आरोपी जेरबंद


घटनेनंतर अकोला पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत सर्व पाच आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली. हे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले आहे.



पोलिसांनी काढली धिंड


पोलिसांनी या आरोपींची कौलखेड परिसरात धिंड काढत ‘रोड शो’ केला. ज्या भागात त्यांनी दहशत पसरवली, त्याच ठिकाणी त्यांना फिरवण्यात आले. यावेळी आरोपींनी कान पकडून नागरिकांची माफी मागितली आणि “अकोला जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा दिल्या. या कारवाईमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक बसला आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी