Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं आपल्या दिलखेचक अदांमुळे फार कमी वेळातच लोकप्रियता मिळवली आहे.


गौतमी सोशल मीडियावरही सक्रीय असते. गौतमीनं तिच्या संपूर्ण कारकि‍र्दीत केवळ स्टेज परफॉर्मेंस केला नसून, अनेक साँग अल्बमसाठीही काम केलं आहे. तिची गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.


नुकताच गौतमीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. गौतमीचं आगामी गाणं 'श्री कृष्ण सावळा रे' प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून हे गाणं म्हणजे भक्ती, प्रेम तसेच समर्पणाचं सुंदर संगम आहे. या गाण्यात राधिकेच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अगदी सुंदररित्या मांडण्यात आल्या आहेत. गौतमीचं आगामी गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलं असून, या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.


या गाण्यात गौतमीच्या नृत्याला अधिक खुलवण्याचं काम सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केलं आहे. तसेच या गाण्याची निर्मिती संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी केली आहे. या गाण्याचे बोल अवंतिका बहिरट यांनी लिहिले असून, या ह्रदयस्पर्शी शब्दांना आदित्य पाटेकर यांच्या सुरेल संगीताची जोड लाभली आहे. तर, या गाण्याचं दिग्दर्शन प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. सोनाली सोनावणे आणि आदित्य पाटेकर यांच्या सुरेल आवाजामुळे या गाण्यानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.





या गाण्यात गौतमीने नजरेत भरणारं सादरीकरण केलं असून पारंपारिक वेशभूषा आणि दागिन्यांमध्ये गौतमी पाटील फार सुंदर दिसत होती. गौतमीचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात.

Mrunal Thakur : प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर तिचा एक

Bigg Boss Marathi 6 : घरातून बाहेर पडला 'हा' सदस्य, प्रेक्षक म्हणाले...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले