Mrunal Thakur : प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस मृणालला हातकड्या घालून व्हॅनमधून बाहेर काढताना दिसत आहेत. तिच्या हातात बेड्या दिसत असून तिच्या मागून काही पोलिसही उतरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहते हैराण झाले. अभिनेत्री मृणाल ठाकूरला अटक का झाली ? नेमकं काय घडलंय ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण व्हिडिओ पाहताच चाहत्यांना याच कारण लक्षात आलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून तिच्यासोबत दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप ही दिसत आहे. त्यामुळे काहीतरी नवीन येणार याचा अंदाज चाहत्यांना आला आहे.


हा व्हिडिओ प्रत्यक्षात मृणालच्या आगामी सिनेमा ‘Dacoit’च्या प्रमोशनचा भाग आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी हा हटके आणि धक्कादायक मार्केटिंग प्लॅन आखला होता. या सिनेमात आदिवी सेश आणि मृणाल ठाकूर लीड रोलमध्ये आहेत, तर प्रकाश राज आणि अनुराग कश्यप महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन शनैल देव यांनी केलं असून येत्या १० एप्रिल २०२६ रोजी जगभरात रिलीज होणार आहे.


या प्रमोशनल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर काहीजण सुरुवातीला घाबरले, तर काहींनी लगेचच हा प्रमोशनल स्टंट असल्याचं ओळखलं. अनेकांनी याचं कौतुक केलं, तर काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या. ‘Dacoit’ हा सिनेमा तेलुगू आणि हिंदी भाषेत एकाच वेळी शूट करण्यात आला असून १० एप्रिल २०२६ तो विविध भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘Dacoit’ या सिनेमाचा ट्रेलरही आलाय. ट्रेलरमध्ये एक शांत लव्ह स्टोरी अचानक धक्कादायक वळणावर जाताना दिसते. सिनेमात जेलमधून पळून जाणं, पोलिस ट्रान्सफर, हाय-स्पीड चेस असे थरारक अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळणार असून त्याबरोबरच मुख्य पात्रांमधील भावनिक संघर्षही कथेला अधिक खास बनवतो. या सिनेमातील मृणालची भूमिका अत्यंत स्ट्राँग दाखवण्यात आली आहे. जिथे ती एकीकडे भावनिक आहे, तर दुसरीकडे खूपच ठाम आणि धाडसी दिसते. आता मृणालची ही भूमिका मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत