Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी या शोचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी बिग बॉसने तिकीट टू फिनाले आणलं आहे.


तिकीट टू फिनालेची झलक बिग बॉसने सदस्यांना दाखवली आहे. ज्यामुळे सदस्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तिकीट टू फिनाले पाहून सदस्य फार उत्सुक झाले आहेत. तर, आता या तिकीट टू फिनालेसाठी सदस्यांमध्ये लढत होणार आहे.


जो सदस्य तिकीट टू फिनाले जिंकेल त्याची एन्ट्री फिनालेमध्ये होणार आहे. तो सदस्य बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचा पहिला फायनलिस्ट ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात आता एकूण ७ सदस्य असून यामध्ये अनुश्री माने, रेवा कौरासे, दिपाली सय्यद, राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, राखी सावंत यांचा समावेश आहे.





त्यामुळे या सात जणांपैकी हे तिकीट टू फिनाले कोण जिंकणार आणि कोणता सदस्य पहिला फायनलिस्ट ठरणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. येत्या १९ एप्रिलला बिग बॉस मराठी ६ चा फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठी ६ कोण जिंकणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Actress Chhaya Kadam : 'बिग बॉस'ची ऑफर आली, पण मराठमोळ्या छाया कदम म्हणाल्या 'नको'; कारण ऐकून व्हाल थक्क!

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम (Actress

Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार

Nikita Rawal Ranbir Kapoor Controversy : रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ! 'बीफ' वक्तव्यावरून 'रामायण'वर बहिष्काराचे सावट; निकिता रावलची जाहीर माफीची मागणी

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माते नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या दोन

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद