Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता गौरव मोरे ( Gaurav More ) विवाहबंधनात अडकला आहे. गौरवनं त्याची मैत्रीण प्रियांका कारेकरसोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून लग्नाच्या शुभकार्याबरोबरच गौरवनं नवीन घरातही गृहप्रवेश केला आहे.


गौरव आणि प्रियांकाच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. गौरव मोरेची जवळची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवेनं ( Rutuja Bagwe ) या नवीन जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मिस्टर आणि मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि तुमच्या सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला प्रेम आणि आनंदाने भरलेल्या दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा."


ऋतुजाने केलेल्या या पोस्टवरून हे स्पष्ट झालं की गौरवनं केवळ लग्न केलं नाही तर आपल्या नवीन संसाराची सुरुवात नवीन घरातून केली आहे. लग्नाबरोबरच गृहप्रवेश झाल्यानं मोरे कुटुंबात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे. गौरवनं आपल्या कष्टानं मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं असून, आता या नवीन घरात प्रियांकासोबत त्यानं गृहप्रवेश केला आहे.


महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून गौरव मोरे घराघरात लोकप्रिय असून तो अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही झळकला आहे. आता त्याच्या या नवीन प्रवासासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर या नवीन जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक