Sunday, April 5, 2026

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

Nashik Accident : दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. ही अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मंत्री गिरीष महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. तसेच मृतांच्या वारसांना ₹५ लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री शिवाजी नगर परिसरात भरधाव वेगात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांचा, त्यात ७ ते १४ वयोगटातील सहा लहान मुलांचाही समावेश असून, दुर्दैवी मृत्यू झाला.

इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका स्नेहसंमेलनाहून परतत असताना रात्री सुमारे १० वाजता हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट विहिरीत जाऊन बुडाले. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अंधार आणि खोल पाण्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि एनडीआरएफ (National Disaster Response Force) चे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, अपघातामागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >