Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी निर्घृण हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात गोळीबाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंब्य्रात झालेल्या या गोळीबारात तीन तरुण गंभीररीत्या जखमी झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दुसरीकडे, भरवस्तीत गोळ्या झाडून आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



नेमकी घटना काय ?


समोर आलेल्या माहितीनुसार, मुंब्रा बायपास परिसरातील सुमैया ताई स्कूलजवळ बुधवारी दुपारी गोळीबाराची एक थरारक घटना घडली. एका किरकोळ वादाचे पर्यावसान थेट रक्तरंजित संघर्षात झाले असून, रागाच्या भरात एका तरुणाने तब्बल पाच वेळा गोळ्या झाडल्या. या अंदाधुंद गोळीबारात तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणाजवळ हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस आरोपीचा वेगाने शोध घेत आहेत.



स्थानिकांची आक्रमकांची मागणी


गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके ठिकठिकाणी रवाना झाली असून, परिसरातील CCTV फुटेजचा आधार घेतला जात आहे. पोलीस प्रत्यक्षदर्शींची देखील कसून चौकशी करत आहेत. या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण असून, "आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोका" अशी आक्रमक मागणी रहिवाशांनी केली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे, ज्यातून या गोळीबारामागील नेमके कारण आणि नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला.

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Bhoot Bangla :अक्षय कुमार आणि एकता कपूरचा मोठा डाव! लवकरच बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच

Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम