Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन १४०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. सिनेमातील सगळ्याच कलाकारांना धुरंधर २ मुळे नवी ओळख मिळाली आहे. याच सिनेमात एका अभिनेत्रीने जेमतेम एका सेकंदाची भूमिका केली आहे. हा धुरंदर २ सिनेमातील सर्वात छोटा रोल म्हणता येईल. एवढ्या कमी लांबीची भूमिका करूनही या अभिनेत्रीची सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे.





'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये अभिनेता रणवीर सिंह चार्टर्ड प्लेनमध्ये जातो. या विमानाच्या दाराजवळ काही क्षणांसाठी एक एअर होस्टेस दिसते. हे दृश्य सिनेमात जेमतेम एका सेकंदासाठी दिसते. यामुळे अनेकांना सुरुवातीला सिनेमा बघूनही ही अभिनेत्री लक्षात राहिली नव्हती. पण स्वतः या अभिनेत्रीने सीनची क्लीप इन्स्टावर शेअर केली आणि त्याला एक कॅप्शन दिली, 'धुरंधर २ मध्ये मला कोणी बघितलं का ?'


नियती पारीखची ही इन्स्टा पोस्ट व्हायरल झाली. दहा लाखांपेक्षा जास्त इन्स्टा युझरनी तिची इन्स्टा पोस्ट बघितली. यानंतर सोशल मीडियात नियतीची चर्चा सुरू झाली. काहींनी नियतीचं कौतुक केलं तर काही जणांनी तिला ट्रोल केलं. पण पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह प्रसिद्धी मिळणं महत्त्वाचं हे सूत्र डोक्यात ठेवून नियतीनं उत्साहानं निवडक ट्रोलरना छान प्रतिसाद दिला. छोट्या भूमिकेसाठी २२ लाख रुपये मिळाल्याचं तिनं एका ट्रोलरला सांगितलं.


नियतीचे इन्स्टावर तीन हजारांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. पण तिनं इन्स्टा पोस्ट केलेली धुरंधर २ ची क्लिप दहा लाखांपेक्षा जास्त इन्स्टा युझरनी बघितली आहे. तिच्या अकाऊंटवर धुरंधर सिनेमातील निवडक कलाकारांसोबतचे फोटो देखील आहेत.

Comments
Add Comment

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे