Mumbai : आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यंदाच्या पावसाळ्याआधी विद्याविहार, सायन आणि गोरेगाव येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होतील. यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. इंधन वाचणार असल्यामुळे इंधनावरील खर्चातही बचत होणार आहे.


मुंबईच्या पूर्व उपनगरांपैकी एक असलेल्या विद्याविहारच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात एलबीएस मार्ग आणि चेंबूर मार्ग यांना जोडतो. या उड्डाणपुलामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोपे होणार आहे. हा पूल २५ जून २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.


विद्याविहार प्रमाणेच सायनचा उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. सायनचा उड्डाणपूल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणार असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा पूल १५ जुलै २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.


महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ तयार होत असलेला महालक्ष्मी केबल स्टेड पूल हा रेल्वे मार्गावरील अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे. हा पूल २०२६ च्या दिवाळी पर्यंत मुंबईकरांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


मुंबईच्या पश्चिम उपनगरांत गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. हा पूल ३१ मे २०२६ किंवा त्याआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.


मुंबईच्या वरळी परिसरातील वाहतुकीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी नेहरू तारांगण येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या या प्रस्तावाचा तांत्रिक अभ्यास सुरू आहे. लवकरच या पुलाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.


उड्डाणपुलांमुळे मुंबईतल्या वाहतुकीचा वेग वाढण्यास, इंधनाची पर्यायाने पैशांची बचत होण्यास तसेच वेळ वाचवण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध