अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान


पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल" अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांचे प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नाशिक (२९,८१२ हेक्टर), अहिल्यानगर (२३,६३३ हेक्टर), जळगाव (२२,३६१ हेक्टर), धुळे (१४,८३२ हेक्टर), बुलढाणा (८,५०७ हेक्टर) व छत्रपती संभाजीनगर (८,४४५ हेक्टर) आदी जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.


राज्यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष आदी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी व खतांचा खर्च वाया गेला आहे.


यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, अशी सर्व बांधवांना विनंती आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :