मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपली कामे घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांना जलद प्रवेश मिळावा यासाठी अत्याधुनिक ‘डीजी ॲप’च्या माध्यमातून डिजिटल ओळखपत्रे वितरित केली जातात. मात्र, ही ओळखपत्रे घरी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता कंत्राटदार कंपनीने तांत्रिक डेटाच्या आधारे अशा व्यक्तींशी संपर्क साधणे सुरू केले आहे.


ज्या अभ्यागतांकडे ओळखपत्रे राहिली आहेत, त्यांना थेट फोन करून कार्ड परत करण्याची विनंती केली जात आहे. अभ्यागत कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा संपर्क क्रमांक काय, याची संपूर्ण नोंद संगणकीय प्रणालीत उपलब्ध असल्याने संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणे प्रशासनाला सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० कार्ड्स परत जमा करण्यात आली आहेत.



प्रवेशासाठी नवे नियम


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, यापुढे ज्या नागरिकांकडे जुने ओळखपत्र राहिले आहे, त्यांना ते जमा केल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक कार्डाचे ट्रॅकिंग केले जात असून, अभ्यागतांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून