भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदान येथे सकल जैन समाज यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा, अमित साटम, संजय उपाध्याय, गुरुदेव नम्र मुनी तसेच मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या प्रगतीत जैन समाजाचे योगदान मोलाचे आहे. गोसेवा आणि सेवाकार्यातही जैन समाज अग्रेसर आहे. भगवान महावीर यांनी दाखवलेला मार्ग मानवतेच्या कल्याणाचा असून या विचारांतूनच विश्व कल्याण साधले जाऊ शकते.
तीर्थंकरांचे विचार सर्वांना सोबत घेवून जाणारे आहेत. समाजाच्या वतीने साकारण्यात येणारी प्राणी रुग्णालयाची संकल्पना भूतदया अधोरेखित करणारी आहे. वारकरी परंपरेशी घट्ट नाळ जोडलेल्या मुंबईतील डबेवाले यांना ई-बाईक्स वितरणाचा उपक्रमही अतिशय स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भगवान महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला. अखिल मानवतेसाठी त्यांनी मार्ग दाखविला. या मार्गाचे अनुसरण सर्वांनी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, जैन समाज हा भारतीय समाज-संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्री लोढा यांनी सांगितले.


महापौर रितू तावडे म्हणाल्या, भगवान महावीर यांचा शांतीचा संदेश आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते अरहम प्राणी रुग्णालयाच्या संकल्पनेचे उद्घाटन तसेच मुंबईतील डबेवाले यांना १०८ ई बाईक्सचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना ५० ई ट्रायसिकलचे वितरणही यावेळी करण्यात आले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य