Iran-US-Israel War : आखाती देशांमधील युद्धाचा गणेश मूर्तिकारांना फटका

- परदेशी मूर्ती पाठवण्यात येत आहेत अडचणी


मुंबई : गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील मूर्तिकारांना यंदा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीचा (Iran-US-Israel War) थेट परिणाम गणेश मूर्तींच्या निर्यातीवर झाला असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच (JNPT) बंदरात विविध मालाचे कंटेनर अडकून पडले आहेत.


या परिस्थितीमुळे गणेशमूर्ती निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या कंटेनरची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी, दुबई, लंडन, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड आणि मॉरिशस यांसारख्या देशांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती (export Ganesha idol) वेळेत पोहोचण्याची शक्यता धोक्यात आली आहे.


याचा थेट फटका स्थानिक मूर्तिकारांना बसत असून त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वाढत्या अडचणींमुळे पेणमधील या पारंपरिक व्यवसायासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.


दरम्यान अमेरीका इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असून हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या सरकारी इमारतीचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले.

Comments
Add Comment

Satara Chemical Factory Blast : तासवडे MIDCतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; सर्व काचा फुटल्या, १० किमीचा परिसर हादरला

कराड : सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कराडजवळील तासवडे एमआयडीसी

Ashok Kharat Case : भोंदू बाबाचा मोठा पर्दाफाश! खरातचा सीएही रडारवर, १५०० कोटींच्या मालमत्तेचा होणार तपास

मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक

Marathwada Weather : मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने

Car Accident : काँग्रेस खासदाराच्या गाडीला अपघात, खासदार जखमी

भंडारा : राज्याच्या राजकीय वर्तुळाला सोमवारी (३० मार्च २०२६) सकाळीच अपघाताची धक्कादायक बातमी कळली आहे. काँग्रेस

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ

सचिव तुकाराम मुंढे मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21