Car Accident : काँग्रेस खासदाराच्या गाडीला अपघात, खासदार जखमी

भंडारा : राज्याच्या राजकीय वर्तुळाला सोमवारी (३० मार्च २०२६) सकाळीच अपघाताची धक्कादायक बातमी कळली आहे. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे (Congress MP Prashant Padole) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खासदार प्रशांत पडोळे निवडक सहकाऱ्यांसह त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून नागपूरच्या दिशेने जात होते, त्यावेळी अपघात झाला. अपघातात फॉर्च्युनर कारचा चक्काचूर झाला. खासदार प्रशांत पडोळे या अपघातात किरकोळ जखमी झाले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे खासदार प्रशांत पडोळे यांची प्रकृती आता स्थिर आहे.


भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली आहे. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचा समोरील भागाचं नुकसान झालं.


सध्या दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे भंडारा येथून नागपूर विमानतळावर जात होते. ते विमानाने दिल्लीकडे प्रयाण करणार होते. पण रस्त्यात ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली