Marathwada Weather : मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


अंदाजानुसार, या भागात वाऱ्यांचा वेग वाढून अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. उर्वरित राज्यात वातावरण ढगाळ राहून वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बदलामागे दक्षिण कर्नाटक भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत आहे. तसेच उत्तर ओडिशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाहात खंड पडल्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे वातावरण अस्थिर झाले असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.


दरम्यान, शहरातील तापमानातही चढ-उतार दिसून येत आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक दमट आणि अस्थिर झाले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा