इंदू मिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा..

गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी..


वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा करावा..


मुख्यमंत्र्यांची भेट घेत स्मारकाच्या कामाला गती देण्याची करणार मागणी..


उपाध्यक्ष अण्णा बनसोडे याचे आश्वासन..


मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.


या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.


यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.


दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे.


या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते

अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी वाहनांचा प्रवास!

मुंबई : मुंबईला वेगाने विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईशी जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून २६ महिन्यांत २ कोटी

चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती;

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५०

 रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार धार्मिक कार्यात सहकार्याची

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता