महाराष्ट्रात पशुपालकांसाठी दिलासा; मदतीच्या नियमांत मोठा बदल

दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याना मदतीची रक्कम जाहीर


मुंबई : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान सोसाव्या लागलेल्या पशुपालकांसाठी राज्य सरकारने मदतीचा नवा आणि सर्वसमावेशक आराखडा जाहीर केला आहे. यापूर्वी मदतीसाठी असलेल्या जाचक अटींमध्ये महत्त्वाचे बदल करून आता 'सरसकट मदत' देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या जनावरांच्या संख्येवर लावलेली मर्यादेची अट आता शिथिल करण्यात आली असून, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या सर्व जनावरांच्या नुकसानीपोटी सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यापूर्वी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेकडो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ मृत जनावरांसाठीच नव्हे, तर पावसाने कोसळलेल्या किंवा नुकसान झालेल्या गोठ्यांच्या दुरुस्तीसाठीही विशेष मदतीची तरतूद करण्यात आली आहे. नियमातील या ऐतिहासिक बदलामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



नियमात केले हे महत्त्वाचे बदल


आता केवळ अल्प किंवा अत्यल्प भूधारकच नव्हे, तर सर्व आपदग्रस्त पशुपालक आणि भूमिहीन शेतकरीही मदतीसाठी पात्र ठरतील.


पूर्वी असलेल्या जनावरांच्या संख्येच्या मर्यादा (उदा. ३ किंवा ६ जनावरे) आता पूर्णपणे हटवण्यात आल्या आहेत.


केवळ मृतच नव्हे, तर पुरात वाहून गेलेली किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे आता मदतीसाठी पात्र धरली जातील.


पोल्ट्रीसाठी असलेली १० हजार रुपयांची जुनी मर्यादा काढून आता सर्व मृत पक्षांसाठी भरपाई दिली जाईल.



अशी मिळणार पशुपालकांना मदत


१. मोठ्या आणि दुधाळ जनावरांसाठी:


मोठी दुधाळ जनावरे: प्रति जनावर ३७,५०० रुपये.
ओढकाम करणारी मोठी जनावरे: प्रति जनावर ३२,००० रुपये.


२. लहान आणि इतर जनावरांसाठी:


लहान दुधाळ जनावरे: प्रति जनावर २०,००० रुपये.
शेळी किंवा मेंढी: प्रति जनावर ४,००० रुपये.


३. कुक्कुटपालन आणि गोठा नुकसान:


कुक्कुटपालन (कोंबड्या): प्रति पक्षी १०० रुपये.
पडझड किंवा पूर्णतः नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३,००० रुपये.

Comments
Add Comment

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; दिल्ली-एनसीआरला मिळाले दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार

नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

मुंबईत ३४० झाडांचा गुदमरलेला श्वास झाला मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे