देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई


मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे ठाकलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताला त्याची झळ बसलेली नाही. देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारची रणनीती तयार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. दरम्यान, इंधन टंचाई किंवा टाळेबंदीबाबत (लॉकडाऊन) चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, जगातील अनेक विकसित देशांमध्ये इंधन संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही देशांनी कामाचे दिवस कमी करून चार दिवसांचा आठवडा केला आहे, तर काहींनी सक्तीचे 'वर्क फ्रॉम होम' लागू केले आहे. मात्र, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी परिस्थिती उद्भवू दिली नाही. ज्या पद्धतीने त्यांनी या संकटाचे व्यवस्थापन केले, त्याचे कौतुक सर्वच मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढूनही केंद्र सरकारने त्याचा भार स्वतः उचलल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.



अफवा पसरवणे हा 'देशद्रोह'च!


देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. देशात किंवा राज्यात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही. अशा अफवा पसरवणे हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली जाई," असा इशारा त्यांनी दिला.



इंधन सुरक्षेसाठी पीएनजीवर भर


राज्यात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा ७५ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. भविष्यात सिलिंडरची टंचाई भासू नये म्हणून 'पीएनजी' (पाईप गॅस) जोडणी प्रक्रियेला गती दिली जात आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील अटी व शर्ती शिथील करण्यात आल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे. पाईप गॅसचा विस्तार झाल्यास घरगुती एलपीजीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि भविष्यासाठीही सरकारची तयारी पूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत