राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

महावितरणच्या पाच वर्षांच्या दरपत्रकाला आयोगाची मंजुरी; १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी आता प्रति युनिट ७.१० रुपये मोजावे लागणार


मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सुमारे एक रुपयाची कपात करण्यात आली असून, आता त्यांना ८.१४ रुपयांऐवजी ७.१० रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पाच वर्षांच्या वीजदर कपात याचिकेला मंजुरी दिल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे.


गेल्या वर्षभरापासून ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, तांत्रिक बाबींची पूर्तता करून आयोगाने आता नवा आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी होणार आहेत.


नवीन दरपत्रकानुसार, घरगुती ग्राहकांसाठी १०० ते ३०० युनिटपर्यंतचा दर १३.२३ रुपयांवरून १२.९४ पैसे इतका कमी झाला आहे. औद्योगिक ग्राहकांसाठीही दिलासा मिळाला असून, त्यांचा दर १०.८८ रुपयांवरून १०.७१ पैसे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती महावितरणने कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आयोगाने ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ या वर्षासाठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे. यामुळे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या आवारात लघुदाब चार्जिंग केंद्र सुरू करणे अधिक परवडणारे होणार आहे.



पाच वर्षांचे वीजदर (प्रति युनिट रुपयांत)


वापर (युनिट) २०२५-२६ २०२६-२७ २०२७-२८ २०२८-२९ २०२९-३०
०-१०० ८.१४ ७.१० ७.०० ६.२० ६.००
१०१-३०० १३.२३ १२.९४ १२.७९ १२.६२ १२.६२
३०१-५०० १७.७८ १७.३५ १७.२७ १६.३८ १६.३५
५०० पेक्षा जास्त १९.२३ १९.१४ १९.०४ १८.४७ १८.४७



राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार


वीजदर कपातीबाबत गेले वर्षभर आयोग, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर विविध सुनावण्या झाल्या. आता संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आयोगाकडून आदेश आल्यामुळे स्पष्टता व निश्चितता आली आहे. वीजदर कपातीच्या आदेशामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. -विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण

Comments
Add Comment

Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंचा 'दिमागी' नक्षलींशी संवाद वाढलाय?

- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न मुंबई :

Mumbai Powai News : दृष्ट काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला अन्...; पवईत तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन महिलेवर अत्याचार!

मुंबई : मध्य मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. घरातील वाईट नजर आणि दृष्ट

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Police Department : लोकसंख्या आणि गुन्हेगारीनुसार होणार पोलीस ठाण्यांची नव्याने रचना

- गृह विभागाकडून ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी; मुंबईसाठी ३६२ मनुष्यबळाची मर्यादा, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र

Maha Walkathon : महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्राचा संदेश; राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या जलसंधारणाच्या कार्याची आठवण ठेवत 21 ऑगस्ट हा दिवस