ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला, असून आता प्रकल्पाच्या मुख्य टनलिंग ड्राइव्हच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूमिगत गतिशील जाळे विस्तारीकरणाच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.


मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खोदकाम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्लरी-शील्ड टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) नुकताच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यानंतर काही दिवसांतच ७० मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करून जलद गतीने काम पुढे नेले जात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ३ डिसेंबर २०२५ रोजी या टीबीएमचे लॉन्चिंग करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे उभारले जाणार असून, त्यांची एकूण लांबी जवळपास ७ किमी आहे. त्यापैकी सध्या सुरू असलेला पहिला बोगदा हा ३.४५ किमी लांबीचा असून त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून कमाल ५२ मीटर असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर हा बोगदा पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन तसेच त्यांच्याही खाली असलेल्या मेट्रो ३ लाईनच्या खालून जाणार आहे.


प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास केवळ ५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल, तसेच कोस्टल रोड आणि अटल सेतू यांच्याशी थेट जोडणी निर्माण होईल. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यामध्ये लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. टीबीएमच्या लॉन्चिंगनंतर प्रकल्पाने अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यामध्ये टीबीएमच्या बॅकअप प्रणालीचे घटक खाली उतरवून त्यांचे टीबीएम शील्डशी संयोजन, तसेच प्रारंभिक टनलिंग ड्राइव्हच्या टप्पा पूर्ण करणे यांचा समावेश आहे. सद्यस्थितीला प्रकल्पातील मुख्य ड्राईव्हचे काम वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी

मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत

नगर पथ विक्रेता समिती' निवडणूक निकाल होणार जाहीर

मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग