Sion Hospital मुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार

मुंबई : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०० खाट संख्येवरून ३,२८६ खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर रितू तावडे, आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन, आमदार कालिदास कोळबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, उपमहपौर संजय घाडी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असून, विस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे. आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँक सारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर असल्यने रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार अत्यावश्यक होता.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, यात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल. एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहेत. काही गंभीर ९ आजारांसाठी २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री जनकल्याण योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुंबई महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे.



सायन रुग्णालयाचा पुनर्विकास म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात – महापौर रितू तावडे


महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आजचा हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमुळे लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून, ही सुविधा आता नागरिकांच्या हक्काची बनली आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सायन रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, हृदयविकार उपचार सुविधा, तसेच वाढीव रुग्णखाटा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार आहेत. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव अशी संस्था आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरांवर आरोग्य सेवा पुरवते. दरवर्षी सुमारे ७५ लाख बाह्यरुग्ण आणि २५ लाखांहून अधिक रुग्णांना उपचार दिले जातात. वन सिटी, वन हेल्थ सिस्टीम उभारत असून यामुळे मुंबईतील कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांना सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल. तसेच, आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास केवळ इमारतींमध्ये नसून, सेवाभाव, पारदर्शकता आणि रुग्णांचा विश्वास यामध्ये आहे. प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब आणि अपेक्षा असते, त्या पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘फाईव्हस्टार सुविधा, पण सर्वांसाठी’ या ध्येयाने महानगरपालिका काम करत आहे.


लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास – टप्पा २ मध्ये होणार विविध कामे




  1. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा पुनर्विकास टप्पा २ मध्ये रुग्णालयाची मुख्य इमारत, कर्करोग उपचार सेवा, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. सध्या १९०० वरून नव्याने होणाऱ्या रुग्णालयात एकूण ३,२८६ खाटांची क्षमता असेल.

  2. १५ मजली मुख्य इमारत २,२०० खाटांची क्षमता.

  3. २४ तास आपत्कालीन सेवा व ऑपरेशन थिएटरची संख्या १२ वरून २४.

  4. रेडिओलॉजी सुविधा एक्स-रे, सिटीस्कॅन एम. आर. आय., सोनोग्राफी न्यूमॅटिक शूट प्रणाली – नमुने जलद पाठवण्यासाठी उपलब्ध असतील.

  5. एकाच छताखाली विशेष सेवा देण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना यांचे कार्यालय देखील मुख्य रुग्णालय इमारतीमध्ये असणार आहे.

  6. अत्याधुनिक प्रयोगशाळा, फार्मसी, कॅथलॅब, रुग्ण आहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपाहारगृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष असेल.

  7. कर्करोग रूग्णांसाठी १३ मजली स्वतंत्र इमारत असेल यामध्ये २०० खाटा असतील. केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेट स्कॅन, एमआरआय, सिटीस्कॅन सुविधा असेल. कर्करुग्णांसाठी अल्पदरात व मोफत उपचार उपलब्ध होतील.

  8. आपत्कालीन सेवा इमारत ही १४ मजली इमारत असेल, यामध्ये ६०० खाटा असतील.

  9. ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल.

  10. बाह्यरुग्ण विभागासाठी १४ मजली स्वतंत्र इमारत असेल.यामध्ये दररोज सुमारे १६,००० रुग्णांची क्षमता, १००+ तपासणी कक्ष, रक्तपेढी व प्रयोगशाळा असेल.

  11. आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रुग्णालयात रुग्णांना ये जा करण्यासाठी ई बग्गी रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आभार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मानले.

Comments
Add Comment

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता

मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत

नगर पथ विक्रेता समिती' निवडणूक निकाल होणार जाहीर

मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग