महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह थांबतो. तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यानं हृदयविकाराची समस्या उद्धवते.


हृदयविकाराच्या झटक्याचं नेमकं कारण काय?


वाढतं कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनुवांशिक घटक, तंबाखू आणि मद्यपान, अतिरिक्त ताण आणि हृदयाचे जुनाट आजार यांसारख्या गोंष्टींकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.


महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त


हृदयविकाराचा झटका हा आजार सामान्य झाला असला तरी पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात मोठा फरक आढळतो. हा आजार पुरुष आणि स्त्रियांसाठीही धोकादायक आहे, परंतु आकडेवारीनुसार पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. पुरुषांमध्ये पहिल्या हृदयविकाराच्या झटक्याचे सरासरी वय सुमारे ६५ वर्षे असते, तर स्त्रियांमध्ये ते सुमारे ७२ वर्षे असते. याचा अर्थ असा की, स्त्रियांमध्ये हा धोका पुरुषांपेक्षा अंदाजे १० वर्षांनी उशिरा वाढतो.


तज्ञांच्या मते, महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो, ज्याचं मुख्य कारण इस्ट्रोजेन हे असू शकते. जरी हे पूर्णपणे सिद्ध झाले नसले तरी, असे मानले जाते की यामुळे हृदयाच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होते. तर दुसरीकडे, पुरुष जास्त प्रमाणात तंबाखू आणि मद्यपान करतात, जे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहेत. , पुरुषांमध्ये तणाव व्यवस्थापनाची क्षमता महिलांपेक्षा कमी असते असे मानले जाते. सततचा ताण आणि मानसिक दबावाचा हृदयावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.


अशी घ्या काळजी


हे समजून घेणं महत्त्वाचं फार महत्वाचं आहे की, योग्य ती काळजी घेतल्यास हृदयविकाराचा झटका पूर्णपणे टाळता येतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणं आणि रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याबरोबरच फळ, पालेभाज्या, मीठ आणि साखर कमी असलेला आरोग्यदायी आहार घेणं आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे