नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, पतीकडून उकळले १० लाख रुपये; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार


मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर करणाऱ्या या नराधमाने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. तसेच तिच्या पतीलाही रेल्वेचं कंत्राट देतो असं सांगून त्याच्याकडून १० लाख रुपये उकळले. व्याजावर पैसै वसूल करण्याच्या बदल्यात महिलांकडे शरीर सुखाची मागणीही केल्याचा धक्कादायक प्रकार या आरोपीनं केल्याचं उघडकीस आलंय. रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याचा जामीन अर्ज आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात तो फरार असल्याची माहिती फिर्यादीच्या वकिलांनी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तिला घरी बोलावलं. त्यानंतर तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.तसच तिचा व्हिडीओ आणि फोटो काढून तिला दाखवलं. हा प्रकार कोणाला सांगितला तर, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.पीडितेला सतत धमकी देऊन आरोपी काही वर्षे तिच्यावर अत्याचार करत राहिला.



महिलेच्या पतीला बसला मानसिक धक्का



पीडित महिलेच्या पतीच्या लक्षात आलं की,आरोपी त्याची फसवणूक करत आहे. पत्नीमुळे पती त्याच्या संपर्कात आला होता. पतीने पत्नीला फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नीनेही पतीला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीला जबर मानसिक धक्का बसला. पती पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी रहीम पद्मसी उर्फ करीम मोहंमद जैन उर्फ करम जोशी याच्या विरोधात ८ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. आरोपीने कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती फिर्यादीचे वकिल महेश शिवदास यांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे फरार आरोपी हा व्याजावर पैसै देतो. अनेक महिलांना त्याने व्याजी पैसे दिले आहेत. व्याजी पैशाच्या वसुलीसाठी तो संबंधित महिलांकडे शरीर सुखाची मागणी करतो, असा आरोप संबंधित महिलांकडून करण्यात आला आहे. त्या महिलांनी आरोपीविरोधात तक्रार करण्यसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

Comments
Add Comment

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि

पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी