पुण्यातून मोठी अपडेट समोर; वसंत मोरेंना अटक होण्याची शक्यता

पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने मोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि आक्रमक वक्ते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुणे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे शिवाजीनगर पोलीस आता वसंत मोरे यांच्या अटकेसाठी आक्रमक पावले उचलण्याची शक्यता आहे.



मोरेंविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांचे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत लहाडे कुटुंबियांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वसंत मोरे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता.



कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला


 

गुन्हा दाखल झाल्यापासून वसंत मोरे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांना आता मोरेंना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



नेमकं प्रकरण काय?



२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वादग्रस्त वक्तव्ये देखील केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास