मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.


मंत्रालय मध्ये आज मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधी सोबत आयोजित बैठकीत मंत्री श्री .राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, माजी आमदार प्रमोद जठार महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, प्रकाश एम. लोणारे शासन मंडळाचे सदस्य राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ,विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंत्री राणे यांनी सांगितले की, पारंपरिक मासेमारीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमतेत वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मच्छीमारांना अत्याधुनिक बोटी, जाळी, तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.तसेच, मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि अनुदान योजनाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचे आधुनिकीकरण आणि मत्स्य प्रक्रियेसाठी उद्योग उभारणी यावरही शासन लक्ष केंद्रित करत आहे.


मंत्री राणे पुढे म्हणाले की, मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे प्रमुख ध्येय आहे. युवकांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे वळावे, यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबवल्या जात आहेत. शासनाच्या या उपक्रमांमुळे राज्यातील मच्छीमार समुदाय अधिक सक्षम होईल आणि मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा