मुंबईला आल्यावर ‘कलावैभव’मध्ये काम करण्याची मिळाली संधी : सचिन देशपांडे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


सचिन देशपांडे यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. गेली पंचवीस वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मूळचे नागपूरचे. त्यांनी प्राथमिक शिक्षण टिळक विद्यालय प्राथमिक शाळेतून घेतले. हडस हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून ते विज्ञान विषयात पदवीधर झाले. शाळेत असताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. नाटकामध्ये भाग घेतला होता. एका नाट्य शिबिरामध्ये त्यांनी भाग घेतला होता. बंगाली असोसिएशनमार्फत अनेक नाट्यस्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. राज्य नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेतला होता. २००० साली ते मुंबईला आले. कला वैभव संस्थेचे, प्रासंगिक करार हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकात त्यांनी इन्स्पेक्टरची भूमिका केली. परेश मोकाशी हे या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक होते. संगीत लग्नकल्लोळ या दुसऱ्या परेश मोकाशींच्या नाटकात त्यांनी परत भूमिका केली. जावई माझा भला या व्यासायिक नाटकात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकात कामं केली.


२००८ पासून त्यांनी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. चार दिवस सासूचे, मला सासू हवी, जावई विकत घेणे आहे, काहे दिया परदेस या मालिकांमध्ये काम केले. भूल भुलैया या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. विक्रम गोखलेच्या शिष्यांच्या भूमिकेत ते होते. बेभान चित्रपट केला, त्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका होती. राजेंद्र बडे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक होते. त्यानंतर कलर्स वाहिनीवर सखी नावाची मालिका आली होती, त्या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिग्पाल लांजेकर होते व त्यांच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. त्यावेळी दिग्पालजीनी त्यांना फर्जंदची कथा ऐकवली होती. त्या दिवसापासून त्यांची जी मैत्री झाली ती आजतागायत टिकलेली आहे.


शिवराज अष्टकांपैकी चार चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. कधी ते छत्रपती महाराजांकडे असतात, तर कधी ते मुघलांकडे असतात. रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटांमध्ये त्यांची कवींद्र परमानंदची भूमिका साकारली आहे, ज्यांनी महाराजांच्या चरित्रावर शिवभारत हे काव्य लिहिले. जे महाराजांसोबत राहायचे. ते लढाई करीत नसत, तर फक्त घटनाक्रम लिहायचे त्यांच्यामुळे आपल्याला त्या वेळचा भरपूर इतिहास माहीत झाला. महाराज मनुष्य होते, त्यांना भावना होत्या, ते आपल्या भावना कवींद्र परमानंदकडे व्यक्त करीत असत, असे भावनिक नाते दाखविण्यात आले आहे, हे. खरच असेल असे सांगता येत नाही कारण इतिहासात याची नोंद नाही.


रणपति शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता सचिनजी म्हणाले की दिग्गपालचा इतिहासाचा अभ्यास चांगला असतो, त्यामुळे आमच्यात वाद होत नाही. आम्ही फक्त इतिहास दाखवतो. कुणाला मोठा किंवा कुणाला लहान दाखविण्याचा प्रयत्न नसतो. आम्ही फक्त इतिहास दाखवितो.


जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा टर्निंग पॉइंट आलेला आहे. मुंबईला आल्यावर त्यांना कलावैभव सारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली, प्रासंगिक करार या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. हा त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला. या नाटकामध्ये दोनच पात्र होते. परेश मोकाशी दिग्दर्शित मु. पोस्ट बोंबिलवाडी या नाटकात त्यांनी भूमिका केली. ती भूमिका देखील टर्निंग पॉइंट ठरली.त्यातील भूमिका वेगळ्याच धाटणीची होती. फार्स कॉमेडी होती. त्यानंतर शरद पोंक्षे दिग्दर्शित एका क्षणात या नाटकात त्यांनी काम केले. त्या नाटकामध्ये शरद, सचिनजी व अश्विनी एकबोटे होते. जावई माझा भला मध्ये विक्रम गोखले सोबत काम करण्याची संधी मिळाली. निवेदिता सराफ सोबत कॉटेज न. ५४ जी नाटक त्यांनी केले, तर सुप्रिया पिळगावकर सोबत खर सांगायच तर या नाटकात काम केले. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे देखील टर्निंग पॉइंट असल्याचे ते मानतात.

Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक