भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर फास आवळला आहे. कोणत्या देशाचे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जावे यावर इराणचे कठोर नियंत्रण आहे. इराणचे हे नियंत्रण अद्याप तसूभरही कमी झालेले नाही. इराणच्या या सामर्थ्यावर हल्ला करण्याचे अमेरिका आणि इस्रायलचे प्रयत्न अद्याप अपेक्षित यश मिळवू शकलेले नाही.


युद्धामुळे भारताला होर्मुझमार्गे होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला होता. पण भारत आणि इराण यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यानंतर इराणने भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली. सध्या या परवानगीमुळे होर्मुझमधून भारताला होणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्याला कोणतीही अडचण नाही. पण भविष्यात युद्धमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होर्मुझमधील परिस्थिती बिघडली तर भारताचे ऊर्जोस्रोत संकटात सापडू नये यासाठी भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला पर्याय असा सुरक्षित सागरी मार्ग शोधला असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.


भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या पश्चिम आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिकमधील तेलाकडे वळत आहेत. भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियमने एका निविदेद्वारे अंगोलाकडून २० लाख बॅरल तेल खरेदी केले आहे. भारत आधी तेल आणि गॅससाठी आखाती देशांवर ४५ टक्के अवलंबून होता. पण पर्याय सापडल्यामुळे आता भारताचे होर्मुझवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.


रॉयटर्सच्या वृत्तानुसार एचपीसीएलने एक्सॉनकडून दहा लाक बॅरल तेलाची खरेदी केली आहे. तसेच इंडियन ऑइल ही कंपनी पश्चिम आफ्रिकेतून तेलाची खरेदी करण्यासाठी काही प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. यामुळे मे महिन्यापासून भारताचे होर्मुझवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होणार आहे.

Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड