BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या महिलांसाठी स्तन कर्करोग (Breast Cancer) तपासणी शिबिरांचे आयोजन २२ जुलै २०२६ रोजी मुंबईत २९८ ठिकाणी करण्यात आले. याशिबिरांत तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. त्यात तब्बल १२७९ महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचे तपासणीत दिसून आले असून सर्व महिलांवरील उपचार (Treatment) महापालिकेच्यावतीने (BMC) मोफत केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने महापौर (Mayor) वैद्यकीय निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा वापर करून महिलांवरील याचे पुढील उपचार मोफत केले जातील असे महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी जाहीर केले.



भाजपच्या सर्व नगरसेवकांसह इतर प्रभागांमध्येही नगरसेवकांच्या माध्यमातून राबवलेल्या या लाडकी बहिण मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याच्या या अंतर्गत घेतलेल्या या शिबिरात तब्बल २७ हजार ८६६ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. आणि एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणात तपासणी केल्यामुळे याची नोंदणी इंडियन बूक रेकॉर्ड तथा आशिया बूक रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. या विशेष मोहिमेबाबत सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे. याबाबत बोलतांना सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आज समितीच्या बैठकीत याबाबत अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. या मोहिमेमध्ये २९८ ठिकाणी हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये २७ हजार ८६६ महिलांनी सहभाग घेतला होता. यात १२७६ महिलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. या तपासणी मोहिमेत ३६० डॉक्टर्स. ९०० पेक्षा अधिक पॅरामेडीकल डॉक्टर्स, २५०० पेक्षा अधिक आरोग्य सेविका तसेच आशा वर्कर्स आदींचे सहकार्य लाभले आहे.


ज्या महिलांमध्ये या आजारांचे लक्षण दिसून आले आहे, त्यांच्यावरील मेमोग्रॉफी तसेच पुढील उपचार हे मोफत केले जाणार आहे. टाटा रुग्णालय आणि नाना पालकर स्मृती ट्रस्टच्यावतीने हे उपचार केले जाणार असून यासाठी लागणारा निधी महापौर वैद्यकीय सहायता निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपलब्ध करून देत किंवा सीएसआर निधीतून उपलब्ध करून देत पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहे. यासर्व महिलांना नवसंजीवनी देण्याचे काम महापालिकेच्यावतीने केले जाणार आहे. याची लक्षणे आढळून आलेल्या महिला या मानसिकदृष्ट्या खचलेल्या आहेत. त्यांचे मनोबल उचावून त्यांना उपचारासाठी तयार करणे आणि त्यासाठी याची मानसिकता तयार करणे आदींसाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे,असेही भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची