BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप केले जात असून या सर्व वस्तूंची खरेदीच्या प्रस्तावांना जून महिन्यांत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या वस्तू विलंबाने मिळणार असल्याचे बोलले जात असले येत्या ३१ जुलैपर्यंत तब्बल ८० टक्क्यांपर्यंत शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाईल असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे.


शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे वाटप अद्याप झालेले नसून काही शाळांमध्येच याचे वाटप झालेले आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्यांनी याबाबत निदर्शनास आणून दिल्यानंतर शिक्षण विभागाच्यावतीने सर्व शालेय वस्तू सादर करत प्रत्येक सदस्यांना वस्तूंची दाखवण्यात आल्या. गणवेशछत्री, रेनकोट, दप्तर, वह्या, तसेच इतर साहित्य हे दाखवण्यात आले. त्यानंतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर सत्ताधारी पक्षाने समाचार घेत आजवर किती वेळा आणि कोणत्या वर्षी शालेय साहित्य विलंबाने मिळाले याची जंत्रीच मांडली. यावर उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांनी सध्या शालेय वस्तूंचे वाटप सुरु असून ३१ जुलैपर्यंत किमान ८० टक्के वस्तूंचे वाटप मुलांना केले जाईल असे आश्वासन दिले.




वस्तूंना का झाला विलंब


मुंबई महापालिकेच्यावतीने चालू शैक्षणिक वर्षांत महापोर्टलवरून २७ शालेय वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भाजपची सत्ता महापालिकेत आल्यानंतर मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी जेम पोर्टलवरून याची खरेदी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यापूर्वीची प्रक्रिया बंद करून करून जेम पोर्टलवरून साहित्यांची खरेदी केली. त्यामुळे प्रक्रियेला काही विलंब झाला आणि याचे प्रस्ताव जून महिन्यांत मंजूर करण्यात आले. वर्ष २०२६-२८ साठी या शालेय वस्तुंची खरेदीसाठी २७८ कोटी ६ लाख रुपये खर्च आला. त्यापूर्वी हा खर्च ३१८ कोटी १५ लाख रुपये येत होता. ‘जेम पोर्टल’व्दारे खरेदी केल्यामुळे केवळ शालेय वस्तुंमध्ये दोन वर्षात पालिकेचे ४३ कोटी ५७ लाख रुपये वाचले असून १३ टक्के रकमेत बचत झाली.‘जेम पोर्टल’व्दारे शालेय वस्तुंची खरेदी करुन मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार विरहीत प्रशासनाचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उचलले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार