मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाज घेणाऱ्या वेधशाळेच्या नोंदीनुसार आतापर्यंत शहरात ७४.२९ टक्के तर उपनगरांत ८०.७३ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सरासरी २१०० ते २३०० मि.मी एवढा पाऊस पडला जातो. त्यातुलनेत आतापर्यंत शहरात १५५३ मि.मी आणि उपनगरांत १८७२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप केले जात असून या सर्व वस्तूंची ...
मुंबईत शहरातील पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेच्या माध्यमातून आणि उपनगरांतील पावसाची नोंद सांताक्रुझ (Santacruz) वेधशाळेच्यावतीने घेतली जाते. मुंबई शहरात मागील २४ तासांमध्ये ५४.८ मि.मी आणि उपनगरांत २१.२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी २४ जुलैपर्यंत शहर भागात ४३.०४ टक्के अर्थात ९०१ मि.मी एवढा पाऊस पडला होता तर उपनगरांत ४९.६९ टक्के अर्थात ११५२ मि.मी एवढा पाऊस पडला होता.
तर महापालिका स्वयंचलित पावसाळी यंत्रावर नोंदवलेल्या नोंदीनुसार शहर भागात ६६. ६० टक्के व उपनगरांत ७१.९३ टक्के एवढा पाऊस पडला आहे. यात आतापर्यंत शहरांत ६६.६० टक्के म्हणजे १३९५.२७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व व पश्चिम उपनगरात ७१.९३ टक्के अर्थात पूर्व उपनगरात १६९६.७४ मि.मी व पश्चिम उपनगरात १६३९.३२ मि.मी एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.