'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे फळ अनेकांना आवडतं. तसेच, चिकू हे फळ चवीलाही स्वादिष्ट असून हे आपल्या शरीरासाठी गुणकारी फळ आहे. चिकू हे फळ हृदय आणि रक्तवाहिन्यांपासून ते किडनीपर्यंतच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाणारे फळ आहे.


चिकू फळाचं सेवन केल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. या फळामुळे हृदय आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच, चिकू हे फळ दिसायला छोटं असलं तरी यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक एकत्रितपणे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतं. तसेच, यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होते. मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि धमन्यांमध्ये 'प्लाक' जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते.


आयुर्वेदेताही चिकूला फार महत्व असून हे फळ आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. तर, यामध्ये असलेले लोह आणि फॉलिक ॲसिडमुळे लाल रक्तपेशींच्या निर्मिती होण्यास मदत मिळते. चिकू फळाचं सेवन नियमितपणे केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच, शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठाही सुधारण्यासाठी चिकू फायदेशीर ठरते.


चिकू फळात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उपयुक्त ठरतात. तसेच, यामुळे किडनीवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते.


चिकू हे फळ एक स्वस्त आणि मस्त असं फळ असून यामुळे आपली पचनसंस्थाही निरोगी राहते. तसेच, चिकूमुळे पचनासंबधित असलेल्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, चिकू या फळाचं नियमितपणे सेवन करणं आपल्या शरीरासाठी अंत्यत फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे