'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. पाकिस्तान अतिरेक्यांना पाठबळ देत आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची कधीही मैत्री होणार नाही असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉल येथे महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आय पी एस किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना रामदास आठवले यांच्या हस्ते महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजक आणि रिपाइं जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना आगरा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी अटलजींची चर्चा झाली होती. तेव्हा पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात. दहशतवाद जोपर्यंत थांबवला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण सबंध स्थापन होऊ शकत नाहीत असे वाजपेयी यांनी सांगितल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ या लष्करशहाने दहशतवाद संपविण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे दहशतवाद संपवण्याची आणि भारताशी मैत्री करण्याची पाकिस्तानचीच इच्छा नाही. अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.


'भारत नाही कुणाचा गुलाम,
म्हणून आम्ही करीत आहोत
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम...'


असे सांगत रामदास आठवले यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा पुरस्काराने सन्मान केला. त्यात बी एस एफ; सी आर पी एफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा समावेश होता. यावेळी २६/ ११ मुंबई हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सबइन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी या आपल्या शिस्तप्रिय कर्तृत्वासाठी लोकप्रिय होत्या. दिल्लीत आयपीएस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांची गाडी जेसीबीने उचलून नेऊन कारवाई केली होती. याची आठवण सांगताना रामदास आठवले यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही. विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने मोदींची विकासाची गाडी पुढे चालली आहे, अशी टिप्पणी केली. तसेच शिस्तप्रिय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा महाराज हरिसिंह डोगरा पुरस्काराने गौरव केला. जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटविल्यामुळे येथील पोलिस बीएसएफ यांना अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने जम्मू काश्मीरमध्ये चांगली शांतता वाढत आहे. दहशतवाद कमी होत आहे. जम्मू काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करायचा आहे आणि ते लवकरच केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वयातून करून दाखवेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि