विषय समित्या सभापती पदांसाठी इच्छुकांची ‘मोर्चेबांधणी’

२३ मार्चला निवडणूक


अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी अलिबाग येथे जिल्हा नियोजन सभागृहात प्राधिकृत अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदांच्या निवडीकडे लागले आहे.


जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका येत्या २३ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. या पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.


महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद विविध विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. त्या आनुषंगाने या पदांसाठी निवडणूक घेणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित आदेश जारी केला आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया संबंधित अधिनियम आणि लागू नियमांनुसार पार पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रायगड जिल्हा परिषदेत साधारण पाच विषय समित्या असतात. यामध्ये महिला व बालकल्याण समिती, अर्थ व बांधकाम समिती, शिक्षण व आरोग्य समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती आणि समाजकल्याण समिती यांचा समावेश आहे. यापैकी एका समितीचे सभापती पद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे जाते. उर्वरित चार समित्यांसाठी निवडणूक होते. त्यामुळे विषय समितीचे सभापती पद आपल्याला मिळावे, यासाठी अनेकांनी आतापासूनच वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याचे समजते. यामध्ये अर्थ व बांधकाम समितीचे सभापती पद अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, अनेकांचा त्यावर डोळा आहे. दरम्यान, दोन सभापती पदे शिवसेनेला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा

तळोजा-खांदेश्वर मेट्रोला मंजुरी

५ हजार ५७५ कोटींची तरतूद तळोजा  : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो