सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार

शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने


गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील, तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात या दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दोघांच्या संवादांमधील चुरस, एकमेकांवरची टोलेबाजी आणि गावातील राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग कथेला वेगळीच रंगत देणार आहेत. येत्या १७ एप्रिलला ‘सालबर्डी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


या भूमिकेविषयी बोलताना शशांक शेंडे म्हणाले, स्थानिक पातळीवरचे राजकारण आणि एकमेकांसोबत असलेल्या नातेसंबंधांची झलक यामध्ये पाहता येईल. तर ओंकार भोजने म्हणाला, ‘उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.’


महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

Comments
Add Comment

सप्त पुरस्कारांची शिदोरी...

प्रयोगिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांच्या मागे कुणी व्यक्ती भक्कमपणे उभी असण्याची शक्यता तशी कमी असते.

‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी...

राजरंग-राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेले 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे नाटक, गेले काही दिवस रंगभूमीवरून

लोककलेचा आवाज

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  डॉ.गणेश चंदनशिवे यांनी कबाड कष्ट करून, खडतर परिस्थितीवर मात करून आपलं अस्तित्व

कथाहोत्र : नाटककारांचे अस्तित्व टिकवणारी सुवर्णसंधी

भालचंद्र कुबल-पाचवा वेद आज मला लिहायचेय ते एका नाट्य उपक्रमाबद्दल. मराठी नाटक जागतिक पटलावर इतर भाषांच्या

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

प्रत्येक रंगकर्मी कधी ना कधी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकतोच आणि तिथून त्याचा नाट्यावकाशातला प्रवास सुरू होतो. पुढे

वीण लिखाणाशी ही तुटेना...

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  मुग्धा गोडबोले - रानडे मुग्धा गोडबोले-रानडे सध्या अभिनयासोबत लेखनाची बाजू