माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनी 'वर्ग-२' मधून 'वर्ग-१' करण्याबाबतचे धोरण ३१ मार्च २०२६ पर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली. आमदार श्वेता महाले यांनी राज्यातील माजी सैनिकांना वाटप केलेल्या सीलिंग जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यात सूट देण्याची मागणी केली होती. या जमिनी सध्या वर्ग २ असल्याने त्या हस्तांतरित करण्यावर कायदेशीर मर्यादा आहेत. महसूलमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत सांगितले की, "या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे."


नव्या नियमांची ३१ मार्चला घोषणा

मंत्री बावनकुळे म्हणाले की, "या जमिनींच्या रूपांतरणासाठी १४ जानेवारी २०२६ रोजी नियमांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. ११ फेब्रुवारीपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर विचार करून आता कायदा व न्याय विभाग आणि वित्त विभागाने ही फाईल मंजूर केली आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत या जमिनी 'क्लास-२' मधून 'क्लास-१' करण्याचे अंतिम धोरण प्रसिद्ध केले जाईल."


अधिमूल्यात मिळणार मोठी सवलत


या जमिनींचे वाटप भूमिहीन, शेतमजूर आणि माजी सैनिकांना करण्यात आले आहे, ही बाब लक्षात घेऊन त्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी सरकार विशेष काळजी घेणार आहे. "नझुल जमिनींच्या रूपांतरणासाठी जो कायदा आणि दर आपण निश्चित केले आहेत, त्यांचा आधार घेऊन या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी किमान रक्कम आकारली जाईल. यामुळे माजी सैनिकांना आणि गरिबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल," असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :