Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार
 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश
 २०० कोटींच्या दंड वसुलीसाठी मालमत्तेवर बोजा चढविण्याचे निर्देश


मुंबई : चिंचोली एमआयडीसीमध्ये झालेल्या बेकायदा मुरूम उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी महसूलमंत्र्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणि कर्तव्यात कसुरी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच, संबंधित कंपन्यांकडून २०० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


आमदार राजू खरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे चिंचोली एमआयडीसीतील अवैध उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महसूलमंत्र्यांनी हे आदेश दिले. बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



२० लाख ब्रासचा अवैध उपसा आणि ५०० कोटींच्या महसुलाचे नुकसान


बैठकीत आमदार राजू खरे म्हणाले की, "चिंचोली एमआयडीसीमध्ये तब्बल २० लाख ब्रास मुरुमाचा अवैध उपसा झाला आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरुम काढल्यामुळे नवीन उद्योगांना जागा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नियोजित १०० उद्योग येऊ शकले नाहीत आणि शासनाचा ५०० कोटी रुपयांचा अपेक्षित महसूल बुडाला आहे. विनापरवाना उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे."



 ४३ कोटींचा दंड १० लाखांवर कसा आला? मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, एका प्रकरणात ४३ कोटी रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला असताना तो केवळ १० लाख रुपयांपर्यंत खाली आणला गेला. या संशयास्पद बाबीची सखोल चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, या कालावधीत जे अधिकारी कार्यरत होते, त्यांची यादी सादर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि