LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून २४ दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय गॅसचे ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारने मात्र सध्या देशात एलपीजी, पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.



आधी १५ दिवसांवरून २१ दिवस, आता २५ दिवस



पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर १५ दिवसांवरून २१ दिवस केले होते. परंतु आता हा कालावधी आणखी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन बुकिंगदरम्यान किमान २४ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.


एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता १४.२ किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर ९१३ रुपयांना मिळत आहे. याआधी त्याची किंमत ८५३ रुपये होती. तर मुंबईमध्ये ही किंमत ९१२ रुपये इतकी आहे.



मोठ्या शहरांमधील एलपीजीचे दर



मुंबई: ९१२.५०


कोलकाता:९३९


चेन्नई: ९२८.५०


एलपीजी गॅसमधील ही नवीन दरवाढ ७ मार्चपासून लागू झाली आहे.



व्यावसायिक सिलेंडरही महाग



हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या सिलेंडरची किंमत १,८८३ रुपये झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कॉमर्शियल एलपीजीच्या दरात ३०२.५० रुपयांची वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ