U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात!


- ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण संदेश, खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट!


नागपूर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले, आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धेला नवा जोश मिळाला.



मान्यवरांची दमदार उपस्थिती :


या प्रसंगी प्रमोद कुमार बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव, राहुल शेवाळे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, रणजीत सावरकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, राकेश तिवारी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव, मिलन वैद्य महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषाताई कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,“खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.” त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.



स्टेजवरून दिला जोशाचा ‘पंच’ :


विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.


देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले,“ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा, देशाचं नाव उज्वल करा.”


या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम