Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला गुंगारा देण्यात यशस्वी ठरली. मात्र, यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. SIT ने त्याची कसून चौकशी केली.


सध्या अशोक खरात प्रकरणाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.


भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी (ED) होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.



मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?


“अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी स्पष्ट सांगतो की अशा प्रकरणाबाबत सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.



अशोक खरातची ईडी चौकशी होणार का?


अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.



सीडीआर कोणी लीक केला? चौकशी होणार


“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी