ॲमेझॉन इंडिया ने आर्मी विमेन्स वेल्फेयर असोसिएशन बरोबर केला सहकार्य करार

- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदत


बंगळुरु : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ चे औचित्य साधून ॲमेझॉन इंडिया तर्फे आर्मी विमेन्स वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) बरोबर सहकार्य करार (एमओयू) करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून या कराराअंतर्गत सैन्यदलातील कुटुंबिय असलेल्या महिला सदस्यांमधील व्यावसायिकतेची संधी देण्यात येणार आहे.


या सहकार्य कराराची घोषणा त्यांच्या एलिव्हेटही कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आली असून या अंतर्गत एडब्ल्यूडब्ल्यूए च्या नोंदणीकृत महिलांना मदत करण्यात येणार असून यामध्ये सैन्यदलातील व्यक्तींच्या पत्नी, माजी सैनिकांच्या पत्नी, वरी नारी आणि विधवांचा समावेश आहे. या अंतर्गत ॲमेझॉन.इन तर्फे २०२९ पर्यंत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी ‍दिली जाणार आहे. या सहकार्य करारा अंतर्गत ॲमेझॉन च्या स्तरीय ऑन बोर्डिंग आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ईकॉमर्स आणि मार्केटप्लेसच्या सर्वोत्कृष्ट गोष्टींचा परिचय करुन दिला जाणार आहे.


एचडब्ल्यूडब्ल्यूए च्या व्यावसायिकांना आता ॲमेझॉन फुलफिलमेंट आणि वाहतूक नेटवर्क सह त्यांची उत्पादने ही ॲमेझॉन सहेली स्टोअरफ्रंटवर दिसणार आहेत. त्याच बरोबर सैन्यदलाच्या परिवारातील महिलांना आता शाश्वत व्यवसाय वृध्दी सह देशभरांतील कोट्यावधी ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळणार आहे.


ॲमेझॉन सहेली प्रोग्राम अंतर्गत जे व्यावसायिक जोडले जातात अशा व्यावसायिकांना संरचनात्मक ऑनबोर्डींग आणि सातत्यपूर्ण सहकार्य मिळते, ज्यामुळे ते ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय निर्माण करु शकतील. ऑनलाईन विक्रीसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये मालाचे व्यवस्थापन आणि ग्राहकांना समृध्द अनुभव देणे इत्यादींचा समावेश आहे. त्याच बरोबर या कार्यक्रमाअंतर्गत उत्पादनाची फोटोग्राफी आणि कॅटलॉगिंगसाठी सहकार्य, ॲनेलिटीकल टुल्स आणि बिझनेस रिपोर्ट्स तयार करण्यापर्यंत सहकार्य केले जाते, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. एकत्रितपणे या क्षमतांमुळे महिला व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनातील नाविन्य आणि त्यांचा ब्रॅन्ड सक्षम करण्यावर लक्ष देणे सोपे जाते.


एडब्ल्यूडबल्यूए च्या अध्यक्षा श्रीमती सुनिता द्विवेदी यांनी सांगितले “ ॲमेझॉन बरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत आणि आमच्या सदस्यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासात शाश्वत आणि योग्य प्रमाणात व्यवसाय करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल. आमच्या या सहकार्य करारामुळे सैनिकांच्या परिवारातील महिला सदस्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. आंम्हाला आशा आहे की या भागीदारी मुळे त्यांचा व्यावसायिक प्रवास त्या अधिक आत्मविश्वासाने सुरु करुन संपूर्ण देशभरांतील ग्राहकांबरोबर त्या जोडल्या जातील.”


दिप्ती वर्मा, व्हाईस प्रेसिडेंट, पीएक्सटी, ॲमेझॉन स्टोअर्स इंडिया, जपान ॲन्ड इमर्जिंग मार्केटस, यांच्या मते एडब्ल्यूडब्ल्यूए बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे, यामुळे व्यवसाय करु इच्छिणार्‍या सैनिकांच्या कुटुंबातील महिलांना संधी मिळू शकेल. ॲमेझॉन मध्ये आम्ही नेहमीच बाजारपेठांची उपलब्धता करुन देणे आणि शाश्वत ऑनलाईन व्यवसायाची बांधणी करुन देण्यासाठी वचनबध्द आहोत. या भागीदारीमुळे महिला व्यावसायिकांना ॲमेझॉन.इन चा वापर करु शकतील आणि त्यासह संरचनात्मक ऑनबोर्डींग सह ॲमेझॉन.इन वर त्यांचा व्यवसाय स्थापन करुन वाढण्यास मदत होईल.”



एलिव्हेटहर २०२६ विषयी अधिक माहिती :


एलिव्हेटहर २०२६ च्या माध्यमातून महिला व्यावसायिकांसह नेत्यांना त्यांच्या करियर वाढीविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहीत केले जाते. ॲमेझॉन लीडर्स कडून १५० हून अधिक सहभागी होणार्‍या छोट्या ग्रुप्स ना एआय,फिनटेक आणि नवीन तंत्रज्ञाना विषयी प्रत्यक्ष ज्ञान देऊन वाढीच्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमामध्ये फायरसाईड चॅट चा समावेश असून ‘नेव्हिगेटिंग करियर रिझेलियन्स’ या विषयावर प्रसिध्द पटकथा लेखिका आणि कलाकार कल्की कोलेचिन आणि दिप्ती वर्मा यांच्यासह फिनटेक व्यावसायिक अली हाजिआनी (दॅड क्रेडिटकार्डगाय) यांच्या कार्यशाळांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मॅरियट बॉनव्हॉय आणि स्विगीची भागीदारी; दैनंदिन जीवनात मिळणार आनंद

स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदे मुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या