भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत दोन्ही देशांनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान विरोधात ड्रोनचा शस्त्राप्रमाणे प्रभावी वापर केला. आता भारत शेषनाग १५० नावाच्या नव्या अतिशय प्रभावी आणि संहारक ड्रोनच्या निर्मितीत गुंतला आहे.

पश्चिम आशियातील युद्धात इराण मोजके पैसे खर्चून तयार केलेले ड्रोन हे बॉम्ब प्रमाणे इस्रायल तसेच अमेरिकेविरोधात वापरत आहेत. हे ड्रोन आकाराने लहान आणि वेगवान असल्यामुळे निकामी करणे कठीण आहे. अमेरिका आणि इस्रायल जी आधुनिक क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली वापरतात, त्याने हे ड्रोन निकामी करता येतात. पण अवघ्या काही हजारांचा ड्रोन नष्ट करण्यासाठी लाखो रुपये खर्चून तयारी केलेली महागडी क्षेपणास्त्र वापरली जात आहेत. शिवाय इराणी ड्रोनचा मोठा ताफा आला तर ती सर्व ड्रोन निकामी करणे कठीण जाते आणि किमान काही ड्रोन शत्रूचे नुकसान करण्यात यशस्वी होत आहेत. या घडामोडींचा अभ्यास करून भारताने स्वतःच्या नव्याने विकसित होत असलेल्या ड्रोनमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. यामुळे भारतीय ड्रोन अतिशय प्रभावी आणि संहारक झाले आहेत.

भारताच्या शेषनाग १५० या ड्रोनची ऑपरेशनल रेंज एक हजार किमी. पेक्षा जास्त आहे. यामुळे हे ड्रोन एकदा उड्डाण केल्यानंतर लांबचा प्रवास सहज करू शकतात. सलग पाच तास आकाशात कार्यरत राहण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. निश्चित केलेल्या लक्ष्यावर घिरट्या घालत अथवा लांबून लक्ष ठेवणे, रिअल टाइम पाळत ठेवणे हे काम शेषनाग १५० ड्रोन सहज करू शकतात. तसेच हे ड्रोन २० ते ४० किलो स्फोटके वाहून नेऊ शकतात. विशिष्ट लक्ष्यावर स्फोटके टाकणे अथवा स्फोटकांसह लक्ष्यावर जाऊन आदळणे असेही हा ड्रोन करू शकतो. एकाचवेळी हजारो शेषनाग १५० ड्रोनचा ताफा विशिष्ट परिसरावर हल्ला करण्यासाठी प्रक्षेपित करण्यासाठी चाचण्या सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
Comments
Add Comment

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)